काही महत्त्वाचे प्रश्न
१) सहजच. कॉम वरील काही गोष्टी विंडोज ९८ मध्ये चालत का नाहीत ?
- विंडोज ९८ हि जुनी प्रणाली असुन सध्या जास्तीत जास्त ठिकाणी विंडोज एक्सपी (Windows XP) वापरतात.
सहजच. कॉम हि कॉम्प्युटर शिकविणारी वेबसाईट आहे आणि जर शिकायचे असेल तर मग जुन्या व काही काळाने बंद होणार्या गोष्टी का शिकायच्या हाच विचार करुन इथे विंडोज एक्सपी वर चालणार्या गोष्टी दिल्या आहेत .
तर मग आपण जर अजुनही तुम्ही विंडोज ९८ वापरत असाल तर लगेचच आपल्या हार्डवेअर इंजिनिअरला बोलावून आपल्या कॉम्प्युटरमध्ये विंडोज एक्सपी टाकुन घ्या.
२) सहजच. कॉम वरील सर्वच गोष्टी विंडोज एक्सपी वर का चालत नाहीत ?
- सहजच.कॉमचा प्रमुख उद्देश हा आपणास फक्त कॉम्प्युटर शिकविणेच नसुन आपणास कॉम्प्युटरमध्ये सुपर एक्सपर्ट बणविणे हा आहे. म्हणुनच जर या वेबसाईट वरील एखादी गोष्ट आपल्या कॉम्प्युटरमध्ये चालत नसल्यास त्या बद्दल लगेच आम्हाला न विचारता त्याचे उत्तर प्रथम स्वत:च आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला आनंद होईल. तुमच्या या प्रयत्नांमध्ये गुगल. कॉम मदत करेल.
आपले प्रश्न गुगल. कॉम वर विचारुन तर पहा! आशा आहे आपणास लगेचच आपल्या प्रश्नांचे उत्तर सापडेल. |